‘नॅचरल शुगर’ आणि ‘विस्मा’तर्फे आयोजित अवर्षनग्रस्त परिस्थितीत शाश्वत ऊस उत्पादन परिसंवादाला प्रतिसाद

धाराशिव : उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्हयातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या नॅचरल शुगर व वेस्ट इंडियन शुगर मिल्स् असोसिएशन (विस्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने अवर्षणग्रस्त परिस्थितीत दर्जेदार व शाश्वत ऊस उत्पादनाच्या दृष्टीने नॅचरल शुगर कारखाना (साईनगर रांजणी, ता. कळंब जिल्हा धाराशिव) कार्यस्थळी आयोजित शेतकरी परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

नॅचरल उत्तोग समुहाचे संस्थापक व ‘विस्मा’चे अध्यक्ष कृषिरत्न बी.बी. ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली १८ मार्च २०२४ रोजी हा परिसंवाद संपन्न झाला. ‘विस्मा’चे कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी ‘विस्मा’ची ध्येये, स्थापना, कार्य, राज्य व केंद्र शासनाची धोरणे याची सविस्तर माहिती दिली. त्यांनी ‘विस्मा’च्या सभासद कारखान्यांमार्फत शेतकऱ्यांकरीता शास्त्रीय मार्गदर्शन कार्यशाळा, शिबिरे आयोजित करीत असल्याचे सांगितले. राज्य व केंद्र सरकास साखर उदयोगाच्या समस्या अडचणी, ध्येय धोरणे यात सहभागी होऊन शेतकरी आणि साखर उद्योगाचे हित जोपासण्यावर ‘विस्मा’ आघाडीवर असल्याचे सांगितले.

या परिसवादप्रसंगी कृषिरत्न बी.बी. ठोंबरे म्हणाले की, ‘नॅचरल शुगर’च्या कार्यक्षेत्रातील पंधरा हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस पिकावरील कार्बन क्रेडीट मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी ‘नॅचरल शुगर’च्या मार्गदर्शनानुसार ५ फुटी रुंद सरीत ऊस लागवड, ठिबक सिंचन आणि खोडवा ऊसामधील पाचट न जाळणे या अटींची पूर्तता केल्यानंतर कार्बन क्रेडीट मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.

महाराष्ट्र राज्याचे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव ने सन १९९६ पासून संशोधनव्दारे नवीन नऊ जाती प्रसारीत केल्या त्या १) वाण को ८६०३२ (निरा) प्रसारीत वर्ष १९९६, २) को ९४०१२ (फुलेसावित्री) वर्ष २००४, ३)को एम. ०२५६ (फुले२५६) वर्ष २००७. ४) को ९२००५ वर्ष २००९, ५) फुले १०००१ (एम. एस.१०००१) वर्ष २०१७. ६) फुले ०९०५७ (कोएम १२०८५) वर्ष २०१९ ७) फुले११०८२ (कोएम११०८२) वर्ष २०२१, ८) फुले ऊस १५०१२ (एमएस१७०८२) वर्ष २०२२. ८) फुले ऊस १३००७(१४०८२) वर्ष २०२३ या ऊस जातींपैकी १५०१२ या ऊस जातीचे संशोधक डॉ. भरत रासकर यांनी मागील ६ वर्षामध्ये उसाच्या नवनवीन जाती संशोधनामध्ये योगदान दिल्याचे नमूद केले.

खोडवा व्यवस्थापनासंदर्भात सदर परिसंवादात ख्यातनाम शास्त्रज्ञ व ऊस संजीवनी ग्रंथाचे लेखक डॉ. बाळकृष्ण जमदग्नी यांनी, ऊस पाचट जाळू नका आणि जमिनीतील कार्बनमध्ये वृध्दी करा, असे आवर्जुन आवाहन केले. शेतकऱ्यांना पाचट कुजविण्याविषयी विस्तृत मार्गदर्शन व ऊस पिकासाठी इतर खताबरोबर संजीवकांचा वापर प्राधान्याने करावा. त्यामुळे उत्पादन वाढीस अत्यंत पोषक व दर्जेदार अधिक २० टक्के अधिक उत्पादन घ्या, असे आवाहन केले. हवामान बदल, अवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये ऊस पीक कसे तग धरून राहील, त्यासाठी उन्हाळयामध्ये विविध प्रकारच्या फवारण्या करून ऊस पीक कसे जगवता येईल, याविषयी ख्यातनाम कृषि शास्त्रज्ञ डॉ. बी.पी.पाटील यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास ऊस उत्पादन शेतकरी नॅचरल कारखान्याचे संचालक, प्रवर्तक, सभासद, कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी आयोजित केलेल्या नामांकीत कंपन्याच्या दालनास शास्त्रज्ञ व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नॅचरल शुगरचे स्पेटवॉशपासून तयार केलेले पोटॅश, संद्रीय खत् जैविक उत्पादने आयसीएल, युपील, कानबायोसिस पारादीप फॉस्फेरस (पीपीएल), उफ्‌को यानी त्यांची संशोधित नाविण्यपूर्ण उत्पादने, वैशिष्ठे, उपलब्धता व वितरण याबददल शेतकऱ्यांना अवगत केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कारखान्याचे संचालक कृषिभूषण पारग आवाड यांनी केले. तात्रिक संचालक अनिल ठोंबरे यांनी आभार मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here