स्पेनमध्ये साखर युक्त खाद्यपदार्थ, शीतपेयांच्या जाहिरातींवर निर्बंध

माद्रिद : स्पेन सरकारने लहान मुलांमधील लठ्ठपणा कमी करण्यासाठी चॉकलेट बार, सोडा अशा उच्च साखर युक्त खाद्यपदार्थ आणि शीतपेयांच्या जाहिरातींवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. स्पेनच्या ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री अल्बर्टो गारजोन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, २०२२ मध्ये टीव्ही, रेडिओ, ऑनलाईन आउटलेट आणि मोबाईल अॅपमध्ये साखर युक्त खाद्यपदार्थ आणि शीतपेयांच्या जाहिराती प्रसारित करता येणार नाहीत.

हे निर्बंध चॉकलेट बार, पेस्ट्री, आइस्क्रीम, शीतपेये आणि इतर शर्करा युक्त खाद्यपदार्थ, पेय पदार्थांच्या जाहिरातींवर लागू असतील. आगामी काळात स्पेनसुद्धा ब्रिटन, नॉर्वे आणि पोर्तुगालसारख्या युरोपीय देशांप्रमाणे मार्गक्रमण करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here