महाराष्ट्रात दहीहंडीवर निर्बंध, आरोग्याला सर्वोच्च प्राधान्याची मुख्यमंत्री ठाकरेची भूमिका 

मुंबई : महाराष्ट्रात यंदा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दहीहंडीचा वार्षिक कार्यक्रम होणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील दहीहंडी मंडळांना याबाबत आवाहन केले आहे. मंडळांनी आरोग्याला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत सांगितले की, कोरोना महामारीच्या फटक्याने अनेक नागरिकांना अद्याप दररोजच्या जगण्याशी लढाई करावी लागत आहे. दहीहंडी मंडळांनी मुख्यमंत्र्यांकडे मर्यादीत प्रमाणात उत्सव साजरा करण्याची परवानगी मागितली होती. मंडळांनी यासाठी सरावही सुरू केला आहे. गेल्या आठड्यात मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तीन ते चार थरांच्या उत्सवाला परवानगी देण्यासह लसीकरण झालेल्या लोकांचा सहभाग घेण्याबाबत चर्चा झाली होती. मुंबईतील मीड डे वृत्तपत्राने काहीजणांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार सरकारने मोजक्या प्रमाणात दहीहंडी उत्सवाला परवानगी देण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो, तशाच पद्धतीने हा उत्सवही साजरा केला जाऊ शकतो.

भाजपचे आमदार राम कदम यांनी आम्ही नेहमीप्रमाणे दहीहंडीचे आयोजन करणार असल्याचे सांगितले. राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी चार फुटी उंचीच्या मूर्तींचा आकार निश्चित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here