नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटामुळे केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावरील निर्बंध ३१ जुलैपर्यंत वाढवले आहेत. बुधवारी डीजीसीएने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. मात्र या कालावधीत काही ठराविक मार्गावर विमान प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक प्रकरणात ही मंजुरी स्वतंत्र राहील.
याशिवाय कार्गो ऑपरेशन्स आणि डीजीसीएकडून खास मंजुरी घेऊन विमान प्रवास करण्यास मुभा असेल. कोरोनाचे संकट सुरू झाल्यानंतर भारताने २३ मार्च २०२० रोजी पहिल्यांदा विमान प्रवासावर निर्बंध लागू केले होते. मात्र मे २०२० मध्ये वंदे मातरम् अभियानांतर्गत खास आंतरराष्ट्रीय विमान सेवा चालवण्यात आली.
याशिवाय काही देशांनी एअर बबल योजनेसह फ्लाइट सुरू ठेवल्या आहेत. अमेरिका, ब्रिटन, यूएई, केनिया, भुतान, फ्रान्ससह २४ देशांसोबत असा करार आहे. डीजीसीएच्या आदेशानुसार आता ३१ जुलैपर्यंत विमान प्रवास करण्यास बंदी असली तरी कार्गो फ्लाइट आणि खास सेवा सुरू राहणार आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link