किर्गिझस्तान सरकारने (Kyrgyzstan government) साखर निर्यातीवर निर्बंध लागू केले असल्याचे सरकारी प्रेस सेवेने जाहीर केले आहे. प्रेस सेवेने सांगितले की, किर्गिझस्तान सरकारने सहा महिन्यांच्या कालावधीसाठी दाणेदार साखर आणि उसापासूनची कच्ची साखर (granulated sugar and raw cane sugar) च्या निर्यातीवर तात्पुरते निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
किर्गिझस्तानमधून मोठ्या प्रमाणावरील होणारी साखर निर्यात रोखण्यासाठी, राष्ट्रीय अन्न सुरक्षेकडे लक्ष देणे आणि बाजारातील किमतींवर नियंत्रण ठेवणे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आले आहे.
किर्गिझ स्टेट एजन्सी फॉर अँटी-मोनोपॉली रेग्युलेशन (Kyrgyz State Agency for Anti-Monopoly Regulation)ने साखरेच्या किमतीत होणारी सातत्याने होणारी वाढ वाढ रोखण्यासाठी किर्गिझस्तानमध्ये प्रत्येक ठिकाणी लक्ष केंद्रीत केले. मात्र, त्यानंतर आढळले आहे की, किर्गीझस्थानमध्ये साखरेची अजिबात टंचाई नाही. तरीही साखरेचे दर सातत्याने वाढत आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी समितीने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या सुरुवातीला किर्गिझस्तानमध्ये साखरेच्या किमतींमध्ये १० टक्के वाढ झाली आहे.