साखरेच्या रिटेल विक्रीचे मॉडेल उत्तम : पी. जी. मेढे

680

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

कोल्हापूर : चीनीमंडी

साखर कारखान्यांमधूनच थेट साखरेची रिटेल विक्री करण्याचा उपाय साखर कारखान्यांच्या पथ्यावर पडला आहे. त्यामुळे त्याचा साखर कारखान्यांना चांगला फायदा होत आहे, असे मत राजाराम सहकारी साखर कारखान्याचे मानद संचालक पी. जी. मेढे यांनी व्यक्त केले आहे. साखरेच्या रिटेल विक्री योजने संदर्भात मेढे यांनी ChiniMandi.com शी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या योजनेचे कौतुक केले.

साखर उद्योगापुढे सध्या अतिरिक्त साठ्याचा प्रश्न आहे. देशांतर्गत बाजारात साखरेला उठाव नाही तर, आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला दर नाही. त्यामुळे साखर कारखान्यांकडे साठा वाढून त्यांच्याकडे आर्थिक चणचण जाणवू लागली. केंद्राने निश्चित केलेली एफआरपी देण्यास असमर्थ असल्याचे सांगून कारखान्यांनी हात वर केले होते.

साधारणपणे साखर कारखाने मोठ्या प्रमाणावर साखर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना साखर विक्री करत होते. त्यानंतर पुढे घाऊक व्यापारी आणि पुढे गावा गावातील छोटे दुकानदार आणि त्यांच्याकडून पुढे सामान्य ग्राहक अशी साखळी होती. पण, साखर व्यापाऱ्यांकडून मागणीच होत नसल्याने कारखान्यांपुढे प्रश्न निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारखान्यांना थेट रिटेलमध्ये साखर विक्री करण्याचा सल्ला दिला होता. त्याला कारखान्यांकडून आणि ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. बाजारात मागणी कमी आहे आणि कारखाने व्यापाऱ्यांना साखर विकत बसतात. त्यामुळे मी त्यांना थेट ग्राहकांसाठी रिटेल विक्री करण्याचे सुचवले होते. जेणेकरून त्यांना पटकन पैसे हातात येतील. यामुळे साखर कारखान्यांना सध्या ज्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे त्यातून ते सहज बाहेर पडू शकतील, असे साखर आयुक्त गायकवाड यांनी स्पष्ट केले. साखर कारखान्याच्या परिसरातच साखर विक्री झाली तर, ते केवळ कारखान्यासाठीच नव्हे तर, ग्राहकांसाठीही फायद्याचे ठरेल, असे मत गायकवाड यांनी व्यक्त केले.

याबाबत राजाराम सहकारी साखर कारखान्याचे मानद संचालक पी. जी. मेढे यांनी Chinimandi.com शी संवाद साधला. ते म्हणाले, ‘थेट रिटेल साखर विक्रीला चांगला वेग असून, ही योजना साखर उद्योगासाठी फायद्याची ठरली आहे. आपल्याच शहरात आपली साखर विकण्यात आंम्ही यशस्वी होत आहोत. कारण, शहरात साखर विक्री होताना वाहतुकीचा खर्च वाचत आहे. असे असले तरी अजूनही खूप मोठ्या प्रमाणावर साखरेचा साठा आहे. साखरेची कारखान्याकडूनच रिटेल विक्री, हे एक यशस्वी मॉडेल ठरले आहे. अतिरिक्त साठ्याच्या समस्येला हा कायमस्वरूपी इलाज झाला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here