शेतकऱ्याने कर्जासाठी आत्महत्या करणे हे वेदनादायी : बाळासाहेब थोरात

संगमनेर : शेतकऱ्यांनी कर्ज फेडता येत नाही म्हणून आत्महत्या करणे अत्यंत वेदनादायी आहे,” अशी खंत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर थोरात बोलत होते. पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील मल्हारी बटुळे (वय 31) या शेतकऱ्याने कर्जामुळे आत्महत्या केली, या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

थोरात म्हणाले, “”शेतकऱ्यांना ताकद देण्याचे काम लोकशाही आघाडी सरकार निश्चित करीत आहे. दोन लाखांपर्यंत व त्यापुढील रकमेसाठी, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेऊन दिलासा देणार आहोत.

ते म्हणाले , मागील सरकारच्या काळात दीड लाखाच्या कर्जमाफीसाठी कुटुंबासह रात्रंदिवस लागणाऱ्या रांगा, किचकट अटी व फॉर्म, तसेच मागील बाकी रक्कम भरण्याची अट असे निकष होते. मात्र, आमच्या सरकारने ही प्रक्रिया सुटसुटीत केली आहे. या कर्जमुक्तीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनाला नव्याने सुरवात होणार आहे. शेतकऱ्यांनी मनोधैर्य न गमावता आपल्या कुटुंबासाठी पाय रोवून भक्कमपणे उभे राहावे. सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील.”

आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याचे विधेयकात रूपांतर करून कायदा करण्यासाठी नंतरच्या देवेंद्र फडणवीस सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. आमचे सरकार ओबीसी व मराठा आरक्षणाला कोणताही धक्का न लावता, मुस्लिमांना कोर्टात टिकेल असे आरक्षण देणार आहे. धर्म म्हणून नाही, तर आर्थिकदृष्ट्या मागास मुस्लिमांना मदत करणे लोकशाहीची गरज आहे. आमच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नाही, असेही ते म्हणाले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here