निर्यात पत हमी महामंडळाने (ECGC) श्रीलंकेसोबत निर्यात व्यवहारांसाठी विमा संरक्षणाच्या हमीचे धोरण बदलले आहे.
प्रचलित परिस्थिती लक्षात घेऊन श्रीलंकेच्या मानांकनाचा आढावा घेतल्यानंतर, पत हमी देणार्या निर्यात पत हमी महामंडळाने श्रीलंकेसाठी विम्याच्या भरपाईसंदर्भात ‘खुली जोखीम संरक्षण’ श्रेणी बदलून ती ‘मर्यादित जोखीम संरक्षण- 1’ (RCC -1) अशी करण्यात आली आहे. या श्रेणीनुसार निर्यात पत हमीसाठी दिल्या जाणाऱ्या सवलतींना बदलत्या मर्यादा लागू असतात आणि त्या केवळ एक वर्षासाठी प्रत्येक व्यवहाराच्या स्वरूपानुसार (case to case basis) लागू राहतात.
मात्र, विमा संरक्षणांतर्गत विमा उतरवलेल्या मालासाठी प्रीमियमच्या दरात बदल केलेला नाही.
महामंडळाने म्हटले आहे कि या बदलामुळे महामंडळाला निर्यात पत विमा पॉलिसीने संरक्षण दिलेल्या प्रत्येक निर्यात व्यवहारातील जोखमीचे मूल्यांकन व देखरेख स्वतंत्रपणे करता येईल व जोखमीची तीव्रता कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करता येतील. हा बदल 07 एप्रिल 2022 पासून लागू होईल.
या उपायामुळे निर्यात पत हमी महामंडळाच्या ग्राहकांना कल्पना येईल की श्रीलंकेतील खरेदीदारांकडून मालाच्या किमतीची वसुली कधीपर्यंत व किती प्रमाणात होऊ शकेल.
श्रीलंकेला मालाची निर्यात करणाऱ्या निर्यातदारांनी त्यांच्या मालावर विमा संरक्षण मिळवण्यासाठी महामंडळाच्या सेवा शाखांशी संपर्क करावा असा सल्ला, महामंडळाने सर्व ग्राहकांना दिला आहे.
निर्यात पतपुरवठा हमी महामंडळ (ECGC) सद्यपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहे व पुढील घडामोडींचे निरीक्षण करून आपल्या विमा संरक्षणाच्या हमीच्या धोरणात योग्य तो बदल करेल असे महामंडळाने म्हटले आहे.
(Source: PIB)