मवाना : मवाना सहकारी ऊस विकास समितीच्या शेतकरी सभागृहात मेरठचे जिल्हा बियाणे उत्पादन अधिकारी कुलदिप सिंह यांनी विभागातील विकास कामांचा आढावा घेतला. यादरम्यान, त्यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व योजनांची भौतिक आणि आर्थिक उद्दिष्टपूर्ती करावी अशी सूचना ऊस पर्यवेक्षकांना केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा अहवाल सरकारला पाठविला जाणार आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मवानाचे ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक सौवीर सिंह, विशेष सचिव नरेश कुमार व इतर मुख्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बियाणे उत्पादन अधिकारी कुलदिप सिंह यांनी पर्यवेक्षकांना मार्गदर्शन केले. राज्यात प्रगतशील बियाणे उत्पादन करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी नर्सरी आणि शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. त्या कामाला पर्यवेक्षकांनी प्राधान्य द्यावे. नर्सरींमध्ये प्रगत बियाणे पोहोचवून जमीन उपचार, रोपे व्यवस्थापन अनुदान, महिला स्वयंसाह्य गटांना प्रती रोप १.३० रुपये अनुदान देणे, खते तसेच कंपोस्ट अनुदान आदींची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नॅशनल फड सिक्यूरिटी मिशन व महिला स्वयंसाह्यता समुह योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. १५ फेब्रुवारीपर्यंत जे उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत, त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.