ऊस उत्पादन वाढीसाठी साखर कारखान्याकडून कार्यक्षेत्राचा आढावा

गढपुरा : ऊसाच्या उत्पादकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि चरीतून पाणी काढण्याच्या समस्येतून तोडगा काढण्यासाठी शनिवारी दिल्लीतून आलेल्या संशोधक डॉ. जे. पी. सिंह यांनी साखर कारखान्याच्या कार्यस्थळ परिसराची पाहणी केली. गढपुरा विभागातील मालीपूर, कौरेय आणि कु्म्हारसो आदी ठिकाणीही पाहणी करण्यात आली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा करुन ऊस उत्पादकता वाढविण्यासाठी सूचना केल्या.

विभागातील बहुतांश भागात पावसाळ्यात अनेक ठिकाणी शेती पाण्यात बुडते. त्यामुळे या भागातील लोकप्रतिनिधींनी या स्थितीतून मार्ग काढण्याची विनंती केली होती. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पिक घेणे सोयीचे व्हावे यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. उत्पादनही वाढू शकेल.

गेल्या वर्षी जमिनीत पाणी साठून राहिल्याने शेकडो एकर उसाचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला. यावेळी हसनपूर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. के. तिवारी, कार्यकारी अध्यक्ष शंभू प्रसाद राय, सी. बी. सिंह, टी. के. मंडल आदी उपस्थित होते.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here