चौसाळा चेकपोस्टवर सद्य परिस्थितीचा लोकप्रतिनिधींनी घेतला आढावा, ऊसतोड मजुरांची केली चौकशी

134

बीड: बीड तालुक्यातील चौसाळा येथील चेकपोस्टवर जावून आम. संदीप क्षीरसागर, आष्टीचे आम. बाळासाहेब आजबे या लोकप्रतिनिधींनी सद्य स्थितीचा आढावा घेवून, इथे अडकलेल्या ऊसतोड मजुरांशी आपुलकीने चौकशी केली.

या चेकपोस्टवर लोकप्रतिनिधी प्रशासनासह हजर झाले होते. ऊसतोड कामगारांची चौकशी करत त्यांना सन्मानाने आपापल्या गावी जाण्यासाठी सहकार्य करण्याबाबत सांगून सर्वच मजुरांना आधार दिला.

तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील आणि जिल्हाबाहेर जाणार्‍या सर्व कामगारांची चौकशी करुन अडचण असल्यास आपल्याशी संपर्क साधवा, असेही आ. संदीप क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी आष्टी पाटोदा शिरुर मतदारसंघाचे माची आम. भीमराव धोंडे यांनीदेखील मजुरांशी संवाद साधला. तसेच सर्वांची जेवणाची सोयही केली.

त्याचबरोबर आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी तालुक्यातील वाकी, खडकत येथील चेक पोस्टवर उसतोड मजुरांच्या नाष्ता आणि जेवणाची सोय केली.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर येथील अनेक मजूर कारखान्यावर अडकले होते. पण 17 एप्रिल रोजी शासनाने मजुरांना आपापल्या गावाकडे पाठवण्याची सोय केली. पण सध्याच्या वातावरणात मजुरांच्या जेवणाची सोय नव्हती, त्यामुळे आष्टी येथे बीड जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी चेकपोस्ट उभारण्यात आली आहेत. इथे जावून लोकप्रतिनिधींनी मजुरांशी संवाद साधला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here