निजामाबाद: बंद साखर कारखाने बनताहेत निवडणुकीचा मुद्दा

निजामाबाद : साखर कारखान्यांच्या पुनर्विकासासाठी दीर्घ काळापासून लढाई लढत असलेल्या निजामाबाद येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी जिल्ह्यातील निवडणुकीचा मुद्दा बनविण्यावर भर दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा ऊस उत्पादनातील प्रमुख म्हणून ओळखला जात होता. मात्र, जिल्ह्यातील दोन ऐतिहासिक साखर कारखाने – बोधन येथील निजाम साखर कारखाना ऊर्फ निजाम डेक्कन शुगर्स लिमिटेड (NDSL) आणि सारंगापूर येथील निजामाबाद को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्ट्री (NCSF) विविध कारणांमुळे २००८ साली बंद पडला. वारंवार आश्वासने देवूनही राज्य सरकारला हे कारखाने पुन्हा सुरू करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

दि न्यू इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, २०१९ च्या निवडणुकीमध्ये, निजामाबादचे खासदार धर्मपुरी अरविंद यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. एनसीएसएफचे हितधारक आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अलिकडेच साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यावर चर्चा करण्यासाठी एक बैठक घेतली. या बैठकीत माजी मंत्री मांडव व्यंकटेश्वर राव यांनी सहभागी होत त्यांना पाठिंबा दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here