उत्तर प्रदेशमध्ये ऊस उद्योगाचे पुनरुज्जीवन: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लखनौ : राज्य सरकारने उत्तर प्रदेशमधील ऊस उत्पादक क्षेत्रातील शेतकऱ्यांना वेळेवर उसाचे पैसे मिळवून देणे आणि बंद साखर कारखान्यांना पु्न्हा सुरू करणे या दोन गोष्टी प्रामुख्याने केल्या. त्यासोबतच राज्यातील साखर उद्योगाचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. लोक भवनमध्ये आपल्या सरकारच्या साडेचार वर्षे पूर्ण केल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

समाजवादी पक्षावर टीकास्त्र सोडताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, २०१७ पूर्वी राज्यात शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले जात होते. २००७ पासून २०१७ पर्यंतच्या कालावधी अनेक साखर कारखाने बंद पाडण्यात आले. आमच्या सरकारने बंद पडलेल्या सर्व साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवन केले आहे. अनेक कारखान्यांची नव्याने स्थापना केली आहे असा दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

ते म्हणाले, उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ८४.२९ टक्क्यांहून अधिक ऊस बिले दिली आहेत. गेल्या पन्नास वर्षात एकाच हंगामात देण्यात आलेले हे सर्वाधिक पैसे आहेत. साखर कारखान्यांनी ३३,०२५ कोटी रुपयांचा १०२८ लाख टन ऊस खरेदी केला होता. त्यापैकी २७,८३७.५२ कोटी रुपयांची थकबाकी देण्यात आली आहे. राज्यातील ४५.२२ लाखांहून अधिक ऊस उत्पादकांना २०१७-२०२१ या दरम्यान उच्चांकी १,४२,८८९ कोटी रुपयांहून अधिक ऊस बिलांचे वितरण सरकारने केले आहे. यातून सरकारचे शेतकरी हिताचे धोरण दिसून येत आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here