ऊस शेतीसाठी नवी क्रांती…

2227

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

पानीपत (हरियाणा) : चीनी मंडी

ऊस तोडणीच्या प्रश्नांमुळे हैराण असलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे. ऊस तोडणीसाठी एक विशेष मशीन तयार करण्यात  आले आहे. या मशिनच्या साह्याने ऊस तोडणी सोपी झाली आहे. पानीपत जिल्ह्यातील नारा गावात या ऊस तोडणी मशीनची ट्रायल घेण्यात आली आहे. शक्तिमान कंपनीने हे मशीन तयार केले असून, शेतकऱ्यांनी ते लाभदायी असल्याचे म्हटले आहे.

नारा गावात धर्मवीर संधू यांच्या शेतामध्ये शक्तीमान कंपनीच्या नव्या मशीनची ट्रायल घेण्यात आली. त्यावेळी गावातील परिसरातील २० ते २५ गावांतील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कंपनीचे अधिकारी विकास रघुवंशी आणि अमित कुमार यांनी मशीनची माहिती दिली. यापूर्वी देशात महाराष्ट्र, कर्नाटक, तमीळनाडू, मध्य प्रदेश आणि तेलंगण या राज्यांमध्ये या मशीनच्या साह्याने ऊस तोडणी सुरू आहे. मशीनची किंमत जवळपास ९५ लाख रुपये आहे. तेलंगण राज्यात या मशीनच्या खरेदीवर सरकारने ७५ टक्के सबसिडी जाहीर केली आहे. त्यासह मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमीळनाडूमध्येही शेतकऱ्यांना या मशीनसाठी सरकारकडून ३५ ते ५० टक्के सबसिडी देण्यात येत आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आलेल्या या मशीनच्या साह्याने कमी वेळेत जादा काम करणे शक्य होते. सरासरी दोन ते अडीच तासांत एक एकरांतील ऊस तोडण्याचे काम हे मशीन करत आहे. सध्या हेच काम करण्यासाठी १० ते १२ मजूरांना तीन ते चार दिवस लागतात आणि त्यांना ५० ते ६० रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे मजुरीही द्यावी लागते. मशीन ऊस तोडणीबरोबरच उरलेल्या पानांचे बारीक तुकडे करून मातीत मिसळण्याचे काम करते. त्यामुळे मातीला जैविक खत तयार होते.

या संदर्भात फफडाना साखर कारखान्यांनचे अतिरिक्त सरव्यवस्थापक बलवान सिंह चहल मशीन पाहण्यासाठी सुरुवातीला महाराष्ट्रात पुण्यात गेले होते. त्यावेळी ऊस पट्ट्यात २० मशीनच्या साह्याने ऊस तोडणी सुरू होती. मशीनच्या ट्रायलवेळी पानीपत साखर कारखान्याचे तसेच, नारायमगड साखर कारखान्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

1 COMMENT

  1. Sugar industry ko swyatta ki jarurat hi kisan ko fayda hoga lekin coporetiv mill ke MD or cm galt kam karte hi galt kam ko Govt officesir lenden karke mita dete hi. Maharashtra me sugar control order todnewale Co op sugar mill par koi kavahi nahi hoti.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here