भात पिक रोगामुळे उद्ध्वस्त, नुकसान भरपाई देण्याची मागणी

नजीबाबाद : भाताचे पिक रोगामुळे उद्ध्वस्त झाल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. भात पिक नष्ट झाल्याने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील बिरुवाला, मथुरापूर मोर, बडिया, गुलालवाली, जट्टीवाला, कंडरावाली, लालवाला विभागातील शेतकऱ्यांनी शिष्टमंडळासह एसडीओ श्याम सिंह यांची भेट घेतली. यावेळी माजी सरपंच साहब सिंह, शिशा सिंह, मलकित सिंह, गुरमेल सिंह, नानक सिंह, सुखचैन सिंह, गुरप्रित सिंह, बूटा सिंह आदींनी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी सांगितले की, कृषी विभागाकडून निश्चित केलेल्या बियाणे केंद्रांतून भाताचे बियाणे खरेदी केले होते. मात्र, हे पिक रोगाला बळी पडले आहे. शेतकऱ्यांनी पंजाबमधून आणलेले भाताचे बियाणे रोगग्रस्त झाल्याच्या कृषी विभागाच्या आक्षेपाबद्दल नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांनी सांगितले की, भाताची नरेंद्रा ५५९, पीआर 1१२१, पीआर ११३ आणि बासमती १७ व १८ या प्रजातींची खरेदी केली होती. त्याला रोगाचा फटका बसल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, कृषी विभागातर्फे वरिष्ठांना अहवाल पाठवला जाईल असे अधिकारी श्याम सिंह यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here