कंगाल पाकिस्तानमध्ये तांदूळ ३३५ रुपये किलो, रमजानमध्ये जनता हवालदिल

इस्‍लामबाद : पाकिस्तानमधील आर्थिक संकटाचे पडसाद रमजान आणि ईदसारख्या सणांवरही दिसून येत आहेत. देशात या संकटामुळे लाखो कुटूंबे ईदचा सण गुपचूप साजरा करीत आहेत. स्वातंत्र्यानंतर देश सर्वात खराब आर्थिक स्थितीचा सामना करीत आहे. अशा स्थितीत महागाई गेल्या सहा दशकात सर्वोच्च स्तरावर आहे. खाण्या-पिण्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत आणि परकीय चलन साठा निच्चांकी स्तरावर आहे. अशा स्थितीत रमजान तसेच ईदवर परिणाम झालेला पाहायला मिळत आहे.

नवभारत टाइम्समधील वृत्तानुसार, लोकांना एक पोते आट्यासाठी अनेक तास रांगेत थांबावे लागत आहे. खाण्या-पिण्याच्या वस्तू, गॅस, तेलाच्या दरातही वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यात किमती प्रचंड गतीने वाढल्या आहेत. खराब आर्थिक स्थितीमुळे देशात निराशेचे वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडूनही देशाला खुशखबर मिळालेली नाही. रमजान सुरू झाल्यानंतर महागाई ३५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. शहरांमध्ये महागाई ४७.१ टक्के तर ग्रामीण स्तरावर ५०.२ टक्के आहे. देशात चिकनची किंमत ३५० रुपये तर तांदूळ ३३५ रुपये प्रती किलोवर आहेत. तशाच प्रकारे मटणाचा दर १४०० ते १६०० रुपयांवरुन १८०० रुपयांवर पोहोचला आहे. संत्री ४०० रुपये डझन, केळी ३०० रुपये डझन, स्ट्रॉबेरी २८० रुपये किलो अशा दराने मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here