धानाचे उत्पादन घटल्याने तांदळाच्या किंमती स्थिर, साखरेच्या उत्पादनात वाढ

नागपूर :
काही नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीत बदल होत आहेत. यामध्ये यंदा धानाचे उत्पादन कमी झाल्याने तांदळाचे भाव वाढले आहेत. किलोमागे 10 रुपयांची वाढ होवून तांदळाचे दर स्थिर झाले आहेत. तर भारतात साखरेचे उत्पादन वाढल्याने साखरेचा दर प्रति किलो 1 रुपयाने घसरला आहे. साखर आता प्रति किलो 35 रुपयांवरुन 33 ते 34 रुपयांवर आली आहे. मात्र, तांदूळ वाढलेल्या स्थितीत तर तूर, हरभरा डाळ आणि खाद्य तेलाचे दर स्थिरावले आहेत.

साखर उद्योगाबाबत बोलायचे झाल्यास, आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्यात वाढून साखर उद्योगाला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे.

इतर अन्नपदार्थांबाबत बोलायचे झाल्यास आपल्याकडे तब्बल 70 टक्के खाद्य तेल विदेशातून आयात केले जाते. यंदा कोरोनामुळे खाद्य तेलाची आयात करण्यात आलेली नाही. शिवाय केंद्र सरकारने पाम तेलावरील आयात शुल्कातही वाढ केली आहे. सततच्या अवकाळी पावसाने भारतात सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ज्याचा परिणाम तेलाच्या उत्पादनावरही झाला आहे. किरकोळ बाजारात सोयाबीन तेल 135 ते 140 रुपये किलो तर शेंगदाणा तेल 160 ते 170 रुपये किलो आहे.

तांदुळाचे दरही वाढले आहेत. पण हे दर स्थिरावले आहेत. एमएमटी 4 हजार, श्रीराम तांदूळ सोडेचार हजार ते पाच हजार 200 वरुन प्रति क्विंटल तर चिन्नोर साडेपाच ते 5 हजार सातशे रुपयांवर पोचला आहे. शिवाय डाळींच्या किंमतीही स्थिरावल्या आहेत. ब्राझील, भारत, थायलंड आणि ऑस्ट्रेलिया या चार प्रमुख साखर उत्पादक देशापैकी थायलंडमध्ये साखर उत्पादन घटले आहे. शिवाय ब्राझीलमध्येही उस उत्पादन कमी असल्याने साखर उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

या सर्वाचा अभ्यास करता, भारतात साखर अतिरिक्त प्रमाणात आहे. आंतरारष्ट्रीय बाजारात साखरेचे दर 2700 रुपये क्विंटलच्या आसपास आहेत. शिवाय आता साखरेला निर्यातीची संधी मिळणार आहे. यामुळे सरकारची निर्यात अनुदानाची योजनाही साखर उद्योगाला लागू होणार आहे. ही अनुदानाची रक्कम प्रति टन 6000 रुपये असून, निर्यात साखरेला प्रति टन सुमारे 3300 रुपये भाव मिळत आहे. यामुळे साखर उद्योगाला आता चांगले दिवस येणार आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here