ठाकुरद्वारा : अवकाळी स्वरुपात बरसलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची कापणीला आलेली भात, ऊस ही पिके आणि भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग पसरले आहेत.
लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात, अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे पिक भुईसपाट झाले आहे. तयार पिकांवर अवकाळी पाऊस पडल्याने सारे काही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. पाऊस आणि थंड हवामानामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसासह जोरदार वाऱ्यामुळे शेतांमध्ये उभी असलेली पिके कोसळली आहेत. त्यावर पाणी साठल्याने ही पिके खराब झाली आहेत. सखल भागातील शेतांमध्ये तर मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. भाताशिवाय इतर पिकांमध्ये ऊस तसेच जनावरांचा चारा, इतर भाजीपाला यांचे खूप नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.