सणासुदीच्या मागणीत तांदूळ, गव्हाच्या किमतीत चढ-उतार

नवी दिल्ली : सणासुदीच्या हंगामात तांदूळ आणि गहू या दोन प्रमुख तृणधान्यांच्या किमती वेगवेगळ्या दिशेने जात असल्याचे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे. सध्याच्या सणासुदीच्या हंगामात गव्हाच्या किमतीत ४ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र तांदळाच्या किमती घसरल्या आहेत. बासमती तांदळाच्या किमती १२ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत, तर गैर-बासमतीच्या किमती ५ टक्क्यांपर्यंत घसरल्या आहेत.
रोलर फ्लोअर मिलर्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (आरएउएमएफआय) अध्यक्षा अंजनी अग्रवाल यांनी सांगितले की, नवीन पीक येईपर्यंत गव्हाच्या किमती स्थिर राहतील, पण बाजारात बासमती तांदळाची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे त्याचे भाव कमी झाले आहेत.
इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, एक महिन्यापूर्वी गव्हाची किंमत सुमारे ₹२,४०० प्रती क्विंटल होत्या. परंतु दिल्लीमध्ये, गव्हाच्या किमती आता ₹ २,५२५-२५५०0 प्रती क्विंटल यांदम्यान आता व्यवहारात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here