साखर कारखाना सुरू करण्याच्या मागणीसाठी रीगा बाजारपेठ बंद

92

सीतामढी: रीगा साखर कारखाना सुरू करण्याच्या मागणीसाठी येथील रीगा बाजारपेठ पूर्णपणे बंद राहिली. सर्व दुकानांसह वाहतूकबी ठप्प झाली.

कारखान्यासमोर हजारो शेतकरी, व्यावसायिकांनी एकजूट दाखवत आपली मागणी कायम ठेवली. सायंकाळपर्यंत बाजारपेठेत स्वयंस्फू्र्तीने शांतता होती. ऑटो, रिक्षासह सर्व प्रकारची वाहने बंद राहिली. शेतकरी, कामगार व्यावसायिक संघटेनेने बंदचे आयोजनकेले होते.

भ्रष्टाचारमुक्ती संघटनेने सर्वांच्या या मागणीला पाठिंबा देत कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी लढा तीव्र करण्याचे आवाहन केले.
भ्रष्टाचारमुक्ती संघटनेचे अध्यक्ष नागेंद्र प्रसाद सिंह म्हणाले, अनेक कारणांनी साखर कारखाना बंद पडला आहे. मात्र, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्येच १५ लाख टन ऊस उभा आहे. कारखाना बंद असल्याने हे शेतकऱ्यांचे ५० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.

कारखाना पुन्हा सुरू करण्याबाबत आणि आधीच्या हंगामातील सुमारे सव्वाशे कोटी रुपयांच्या थकित बिलांबाबत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल.

आंदोलनस्थळी कारखान्याचे मालक ओमप्रकाश धानुका यांच्याशी आंदोलक शेतकऱ्यांनी संपर्क साधला. कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे धानुका यांनी सांगितले.

ते म्हणाले, कारखाना सुरू नसल्याने शेतकऱ्यांना मातीमोल किमतीला ऊस इतरत्र घालावा लागत आहे हे दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांना मागील थकबाकी देण्यासाठी केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून काही पैसे मिळाले आहेत.

कारखान्यावरील वजनकाटा सुरू करून सध्या सुरू असलेल्या कारखान्यांना योग्य किमतीला ऊस पाठवला जाईल. पुढच्या हंगामात साखर कारखाना सुरू करण्यासाठीची तयारी आतापासून सुरू केली जाईल.

दरम्यान, शेतकरी संघटनांनी याबाबत लोकप्रतिनिधींची विशेष बैठक घेण्यात येईल असे सांगितले. यावेळी माजी आमदार नगीना देवी, लखनदेव ठाकूर, गुणानंद चौधरी, अनुपात लाल पंडित, अशोक ठाकूर, मदन मोहन ठाकूर, प्रेमचंद प्रसाद, नरेंद्र कुमार सिंह, रामनरेश सिंह, रामपुकार यादव, राम नरेश यादव,जोगिदर सिंह, रामबाबू गुप्ता, लालजी महाजन, जय प्रकाश अग्रवाल, सुनील कुमार बबलू, राजेश कुमार मामा, अमर कुमार, लक्ष्मी महतो, सरयुग प्रसाद, उमेश साहब, अजीत कुमार सिंह, भूपेश कुमार, शैलेंद्र प्रसाद, नारायण राय आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here