रिगा साखर कारखाना चालविण्यासाठी लवकरच निविदा काढून गुंतवणूकदारांना आमंत्रित केले जाईल. साखर कारखान्यातील वादाबाबत नियुक्त नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलचे प्रतिनिधी नीरज जैन यांनी राज्य सरकारला ही माहिती दिली. रिगा साखर कारखाना पुन्हा सुरू झाल्यास सीतामढी आणि शिवहर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना खूप बळ मिळणार आहे. शेतात ऊभ्या असलेल्या ऊस पिकाला चांगला दर मिळेल.
एनसीएलटीच्या प्रतिनिधींनी राज्य सरकारला सांगितले की, यासाठी सहा महिन्यांचा कालावधी निश्चित केला आहे. त्यानंतर तीन महिन्याचा विस्तारीत कालावधी मिळू शकेल. गुंतवणूकदार बोलविण्यासाठी दोन ते तीन वेळा निविदा प्रक्रिया होईल. जर या कालावधीत चांगला गुंतवणूकदार मिळाला नाही तर एनसीएलटीकडून लिक्विडेटर नियुक्त करून लिलाव प्रक्रिया सुरू केली जाईल. त्यातून मिळणारी रक्कम कारखान्याच्या गुतंवणूकदारांमध्ये वाटप केली जाईल. निविदा जारी करण्यापूर्वी व्हॅल्यूएटर नियुक्त करून कंपनीच्या मालमत्तेचा आढावा घेतला जाईल. यापूर्वी बँकांकडून २०१८ मध्ये कारखान्याच्या मालमत्तेचे मूल्यांकन केले होते. रिगा कारखान्यांची मालमत्ता १४० कोटी रुपये आणि देणी २४४ कोटी रुपयांची असल्याचे आढळून आले होते.