खतांच्या किमती वाढल्याने फिलिपाईन्समध्ये साखर उद्योगावर परिणाम

मनिला : फिलिपाईन्समध्ये उत्पादन खर्च गगनाला भिडत चालल्याने चक्रीवादळाचा फटका बसलेले दक्षिण नेग्रॉस ऑक्सिडेंटलमधील ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. देशात एकूण ४,२३,३३३ हेक्टरमध्ये ऊस शेती केली जाते. त्यामध्ये नेग्रॉस ऑक्सिडेंटलमधील ५३ टक्के शेतीचा समावेश आहे. Sugar Regulatory Authority (एसआरए) बोर्डाचे माजी सदस्य डिनो युलो यांनी सांगितले की, खते आणि पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढल्याने साखर उत्पादकांचे उत्पन्न सातत्याने घटत आहे. साखर उद्योगात गतीने झालेल्या वाढीचा विपरीत परिणाम काही प्रमाणात मोनो क्रॉप अर्थव्यवस्था बनलेल्या नेग्रॉस ऑक्सिडेंटलवर होणार आहे.

युलो यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, युरीयाच्या किमतीत गेल्या दीड वर्षात २५५ टक्के वाढ झाली आहे. १८ महिन्यांपूर्वी ५० किलोची (एलकेजी) गोणी पी९०० या दराने मिळत होती. आता पी २३००-२४०० या दराने ती खरेदी करावी लागत आहे. शेतकऱ्यांना पेट्रोलियम पदार्थांच्या उच्च दरांचाही सामना करावा लागत आहे असे युलो म्हणाले. ते म्हणाले, पेट्रोलियम पदार्थांच्या किमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत. डिझेल इंधन पी ५० प्रती लिटरवर पोहोचले आहे. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत साखर उद्योगाचे वार्षिक योगदान P90 बिलियनपेक्षा अधिक आहे. खते आणि पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीचा साखर उद्योगावर गंभीर परिणाम होईल असा इशारा युलो यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here