भारतच नव्हे तर जगभरात वाढतेय महागाई, उपाय योजनांचे प्रयत्न सुरू : केंद्रीय मंत्री पियूष गोयल

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तू आणि इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे बजेट कोलमडले आहे. आता सातत्याने वाढणाऱ्या महागाईवर केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी आपली भूमिका मांडली आहे.

पियुष गोयल म्हणाले, पूर्ण जगभरात महागाई आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती कारणीभूत आहे. कोविड महामारी आणि आता रशिया-युक्रेन संघर्ष याचा हा परिणाम आहे. विविध देशांसोबत आम्ही चर्चा करीत आहोत, की यावर कसे नियंत्रण मिळवता येईल. काल ब्राझील सोबत यावर चर्चा झाली आहे.

इंडिया टीव्ही डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार मंत्री गोयल म्हणाले, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत जवळपास ३ लाख ४० हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यातन ८० कोटी लोकांना एक हजार टन धान्य देण्यात आले आहे. पूर्वीच्या राजकारणात अँटी इन्कम्बन्सी होती. आता प्रो इन्कम्बन्सी असते. गरीबांवर खर्च करणे हा बोजा नाही. मोदी सरकारने याला प्राधान्य दिले आहे. निवडणुकीशी याचे काही देणेघेणे नाही. निवडणुकांच्या अनुषंगाने याकडे पाहणे हा गरीबांवर अन्याय होईल. सप्टेंबरपर्यंत ही योजना सुरू राहील. गहू, तांदूळ, साखर आदी अन्नधान्य पुरशा प्रमाणात आहे. मात्र, भारत जगाची चिंता करीत आहे, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here