पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ, डिझेलचे दर स्थिर

नवी दिल्ली : शनिवारी पेट्रोलच्या दरात ३० पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोलचा दर आता १०१.८४ पैसे प्रती लिटरवर पोहोचले. तर डिझेलचा दर ८९.८७ रुपये प्रती लिटरवर जैसे थे राहिले.

तेल कंपन्यांनी एक दिवसापूर्वी सुधारणा आणि जागतिक स्तरावरील तेलाच्या दरांची सांगड घालण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केला नव्हता. त्यामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर १०१.५४ रुपये प्रती लिटर तर डिझेलचा दर ८९.८७ रुपये प्रती लिटर झाला होता. गुरुवारी तेल कंपन्यांनी राजधानी दिल्लीत पेट्रोल, डिझेलच्या दरात ३५ पैसे आणि १५ पैशांची वाढ केली. त्यामुळे आता इंधन दर नव्या उंचीवर पोहोचले होते.

एक मे रोजी ९०.४० रुपये प्रती लिटरवरून सुरू झालेली दरवाढ दिल्लीत आता १०१.८४ रुपये प्रती लिटरवर पोहोचली आहे. गेल्या ७७ दिवसांत ११ रुपये १४ पैसे प्रती लिटर दरवाढ झाली आहे. अशाच पद्धतीने डिझेलच्या दरात गेल्या दोन महिन्यांत ९.१४ रुपये प्रती लिटरची वाढ झाली. त्यामुळे राजधानी दिल्लीत आता ८९.८७ रुपये प्रती लिटर दर झाले आहेत.
गेल्या दोन महिन्यात झालेल्या दरवाढीमध्ये गेल्या ७७ दिवसांतील ३० दिवस दरात बदल झाले आहेत. तर ३७ दिवस दरात बदल करण्यात आले नव्हते.

ग्राहकांना केवळ ही दरवाढ थांबण्याची गरज आहे. जागतिक स्तरावर गेल्या १० दिवसांत इंधन दर ७७ डॉलर प्रती बॅरलवरून ७३ डॉलर प्रतीबॅरलवर आले आहेत. त्यामुळे कपातही करणे शक्य आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here