धरणे आंदोलन करुन शेतकर्‍यांनी केली ऊस थकबाकीची मागणी

रोहतक : ऊस थकबाकी देणे आणि विजेचे कनेक्शन देण्यासह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी मंगळवारी धरणे आंदोंलन केले. अखिल भारतीय किसान सभेच्या शेतकर्‍यांनी लघु सचिवालयाच्या बाहेर धरणे आंदोलन केले. या आंदोलनाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रीत सिंह होते. शेतकरी म्हणाले, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील. याबराबेरच शेतकर्‍यांनी ट्रॅक्टर ची सबसीडी सुरु करणे आणि खराब झालेल्या पीकांची भरपाई देण्याची मागणीही केली आहे.

किसान सभेचे जिल्हा सचिव सुमित सिंह व कोषाध्यक्ष बलवान सिंह यांनी सांगितले की, प्रशासन शेतकर्‍यांच्या समस्यांचे निवारण करण्यात असफल झाले आहे. ज्यामुळे किसान सभेने उपायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु केले आहे. या समस्यांशी अनेकदा प्रशासनाला यापूर्वीही अवगत केले आहे. पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. साखर कारखान्यामध्ये ऊस गाळप बंद होवून आता जवळपास दोन महिने झाले, पण शेतकर्‍यांचे करोडो रुपये अजूनही भागवलेले नाहीत. ट्रॅक्टर ची लाखो रुपयांची सबसीडी देखील देय आहे आणि खराब झालेल्या पीकांची गेल्या तीन वर्षांची भरपाई ही दिलेली नाही. या सर्व मागण्या पूर्ण न झाल्याने शेतकर्‍यांच्यात रोष आहे.

या आंदोलनाला किसान सभा राज्य उपप्रधान इंदरजीतसिंह, किसान सभा जिल्हा उपप्रधान जोगेंद्र बनियानी आणि कॅप्टन शमशेर मालिक, सर्व कर्मचारी संघ, जिल्हा सह सचिव प्रेम घिलोडिया, एसएफआय राज्य सचिव सुरेंद्र घनघस व अर्जुन, पीटीआय शिक्षिकांनीही आपले समर्थन दिले आहे. यावेळी सुनील खरावड, अशोक राठी, सुंदर, समुंद्र चिडी, रामकिशन नोनंद, राजकुमार, अनिल खरावड, आनंद मायना, संदीप कटवाडा आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here