लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याचा रोलर पूजन कार्यक्रम संपन्न

लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना ली,सुंदरनगर तेलंगाव ता.धारूर.जी.बीड . मधील गळीत हंगाम २०२०-२१ करीता पूर्व तयारीच्या अनुषंगाने रोलर पूजन कार्यक्रम कारखान्याचे मार्गदर्शक तथा माजी,मंत्री प्रकाशदादा सोळंके यांच्या उपस्थितीत, चे.श्री. धैर्यशील सोळंके यांच्या शुभहस्ते गुरुवार दिनांक १६/७/२०२० रोजी सकाळी ११.वाजता संपन्न झाला. कार्यक्रम प्रसंगी मा.चे.श्री.धैर्यशील सोळंके म्हणाले कि, आगामी गळीत हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात चांगले पाऊसमान असल्याने ऊसाची उपलबद्धता मोठ्या प्रमाणावर होणार असून त्याकरिता कारखान्याकडे हंगामपूर्व कामे वेळेत पूर्ण करून कारखाना गळीत हंगाम लवकरात लवकर चालूकरण्यासाठी सर्व कर्मचारी ,कामगार यांनी आपापल्या विभागाची कामे पूर्ण करावीत असे आवाहन त्यांनी केले.या कार्यक्रमास कार्यकारी संचालक श्री.एम .दि. घोरपडे यांचेसह सर्व खातेप्रमुख , उपखातेप्रमुख,कर्मचारी कामगार उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here