बुखारेस्ट : साखर कारखाना बंद पडू नये यासाठी रोमानियाचे कृषी मंत्री अँड्रियन चेस्नोइयू यांनी फ्रान्सची साखर आणि इथेनॉल समूह Tereosसोबत चर्चा करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी साखर उत्पादक कंपनी Tereosने म्हटले होते की, या वर्षीच्या सुरुवातीला ते रोमानीयातील आपल्या लुडस साखर कारखान्याच्या युनियनसोबत कारखाना बंद करण्याबाबत ते विचार-विनिमय करीत आहेत.
प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, या कारखान्यात २०२० मध्ये जवळपास १८० कर्मचारी होते. आणि हा कारखाना रोमानीयातील दोन उर्वरीत गाळप करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. देशात सातत्याने ऊस क्षेत्रात घट होत असल्याने हा कारखाना सातत्याने तोट्यात सुरू आहे. कृषी मंत्री अँड्रियन चेस्नोइयू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, एक चांगल्या पद्धतीने सुरू असलेला कारखाना बंद करणे आणि तो कवडीमोलाच्या दरात विकला जाणे ही खूप शरमेची बाब आहे. आम्ही देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहित करू इच्छितो असे ते म्हणाले. कोणत्याही एकाच उत्पादकावर आम्ही अवलंबून राहू इच्छित नाही, असे त्यांनी सांगितले. यासाठी आम्ही कारखाना सुरू ठेवण्यासाठी हरेक प्रयत्न करू. Tereosच्या प्रवक्त्याने सांगितले की, काही आठवड्यापूर्वी आमच्याशी मंत्र्यांनी संपर्क साधला होता. कारखान्याचे राष्ट्रीयिकरण केले जाऊ शकते असे त्यांनी सांगितले. कृषी मंत्रालयाने बिट उत्पादक शेतकरी संघासोबत साखर निर्माता कंपन्यांनाशी विचारविनिमय केला आहे.