रुडकी : साखर कारखान्यासमोर माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचे आंदोलन

डेहराडून : दिल्लीहून डेहराडूनला परतताना माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी सायंकाळी उत्तर शुगर मिलच्या प्रवेशद्वारावर मौनव्रत धारण करत धरणे आंदोलन केले. राज्य सरकारने लवकरात लवकर ऊस दर जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. सरकारने जर लवकर दर जाहीर केला नाही तर राज्यातील सर्व साखर कारखान्यांच्या बाहेर प्रतिकात्मक मौनव्रत आणि धरणे आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला.

माजी मुख्यमंत्री रावत यांनी आधी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, दिल्लीहून रुड़कीमार्गे डेहराडूनला परत येत आहे. यादरम्यान उत्तर शुगर मिल वाटेवरच आहे. ऊस दर अद्याप जाहीर झाला नसल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत. मी सातत्याने ऊस दर जाहीर करण्याची मागणी सरकारकडे करत आहे. मात्र, सरकारने कान बंद केले आहेत. प्रतिकात्मक स्वरुपात मी उत्तम कारखान्याच्या गेटवर धरणे आंदोलन करीत आहे.

सायंकाळी सहा वाजता लिब्बरहेडीच्या उत्तम शुगर मिलच्या प्रवेशद्वारावर काँग्रेस कार्यकर्त्यांसमवेत येऊन त्यांनी आंदोलन केले. यावेळी त्यांनी भाजपच्या केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसोबत गैरव्यवहार केला जात असल्याचा आरोप केला. लखिमपूर खिरी घटनेने भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. सरकारने लवकर ऊस दर जाहीर केला नाही तर राज्यभर आंदोलन केले जाईल इसा इशारा त्यांनी दिला. यावेळी आमदार काजी निजामुद्दीन, माजी नगराध्यक्ष चौधरी इस्लाम, डॉ. शराफत अन्सारी, नूर आलम ठेकेदार, सुधीर शांडिल्य, मोनू प्रधान, संजीव प्रधान, राजवीर सिंह, फरमान खान, प्रद्युम्न अग्रवाल, परवेज नंबरदार, राजा कुरेशी व महमूद अन्सारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेसचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत असेही रावत म्हणाले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here