लोकनेते कारखान्याकडून दिवाळीसाठी १०० रुपयांचा हप्ता : संस्थापक राजन पाटील

सोलापूर : साखर कारखानदारीच्या आव्हानात्मक काळात लोकनेते बाबुराव पाटील कारखान्याने कर्जमुक्त होण्याबरोबर ऊस उत्पादकांचा विश्वास संपादित केला ही बाब साखर कारखानदारीसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन बारामती हाय टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्राताई अजित पवार यांनी येथे केले. लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याच्या २० व्या गळीत हंगामाचा प्रारंभ सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आ. यशवंत माने होते.

गळीत हंगाम प्रारंभ प्रसंगी कारखान्याचे संस्थापक राजन पाटील, चेअरमन बाळराजे पाटील, संचालक अजिंक्यराणा पाटील, राजश्री पाटील, डॉ. विनिता गोरे, प्रियंका पाटील, प्राजक्ता पाटील, अंजली क्षिरसागर, पायलट ऋतुजा पाटील, कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे आणि सर्व संचालकांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थापक राजन पाटील यांनी दिवाळीसाठी १०० रुपये प्रती टन दर जाहीर केला. ५ तारखेपर्यंत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील असे ते म्हणाले.

पाटील म्हणाले की, लोकनेते साखर कारखान्याच्या उभारणीमध्ये खा. शरद पवार यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोलाचे योगदान आहे. कामासाठी दुसऱ्यांदा त्यांच्याकडे जायची वेळ आली नाही. आजवरच्या राजकीय वाटचालीत दादांची बहुमोल साथ अनगरकर परिवाराला आहे. बॉयलर प्रतिपदन कार्यक्रमात ७५ रुपये दर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिला होता. दिवाळी सणासाठी १०० रुपये दर देण्यात येणार आहे. आ. माने यांनी येत्या काळात विधान परिषदेवर आमदार म्हणून बाळराजे पाटील यांना संधी देण्याबाबत आपण ना. अजित पवार यांच्याशी बोलावे, अशी विनंती सुनेत्रा पवार यांना केली. महादेव माने यांनी सूत्रसंचालन केले. तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here