पीएम किसान : १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हजार कोटी रुपये जमा

नवी दिल्‍ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी, ३१ मे रोजी पंतप्रधान सन्मान निधी योजनेचा ११ वा हप्ता देशातील १० कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केला. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे झालेल्या एका समारंभात मोदी यांनी योजनेअंतर्गत २१,००० कोटी रुपये जारी केले. केंद्र सरकारने आठ वर्षे पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधानांच्या उपस्थितीत या समारंभाचे आयोजन केले होते. शिमलामधील रिज मैदानात झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी व्हर्च्युअल पद्धतीने शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांशी चर्चाही करतील.

हिंदी न्यूज१८ डॉट कॉमवरील वृत्तानुसार, योजना अधिक प्रभावी व्हावी आणि शेतकऱ्यांना लाभ पोहोचावा यासाठी या समारंभाचे आयोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांसाठी चालविल्या जाणाऱ्या इतर विविध योजनांबाबतही चर्चा करतील. दरम्यान, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील आपले नाव तपासण्यासाठी योजनेच्या https://pmkisan.gov.in/ ही वेबसाईट पहावी. तेथे farmer corner वर क्लिक करा. नवे पेज ओपन झाल्यावर beneficiary listचा ऑप्शन सिलेक्ट करून राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव तपासा. त्यानंतर रिपोर्टमध्ये लाभार्थ्यांच्या यादीत नाव तपासावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here