साखर कारखान्याच्या स्फोटात मृत कामगारांच्या कुटूंबांना ५५ लाखांची भरपाई

काकीनाडा : काकीनाडाच्या जिल्हाधिकारी कृतिका शुक्ला यांनी सांगितले की, वाकालापुडी औद्योगिक क्षेत्रातील पॅरी शुगर रिफायनरीतील स्फोटोत मृत झालेल्या दोन कामगारांच्या कुटूंबीयांना नुकसान भरपाईच्या रुपात ५५ लाख रुपये दिले जाणार आहेत. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, मृत वीरा व्यंकट सत्यनारायण आणि वीर मल्ला राजेश्वर राव यांच्या कुटूंबांना ४० लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाईल. यासोबतच पॅरी साखर कारखाना व्यवस्थापन, कामगार कायद्यांतर्गत १० लाख रुपयांचा विमा आणि वायएसआर विमा योजनेतून ५ लाख रुपये दिले जाणार आहेत. व्यवस्थापनाने मृत व्यक्तींच्या कुटूंबातील एकाला नोकरी देण्याचेही मान्य केले आहे.
त्यांनी सांगितले की, नऊ गंभीर कामगारांना त्यांच्या जखमी होण्याच्या प्रमाणावर आधारीत नुकसान भरपाईसह औषधोपचाराचा खर्च पूर्णपणे कंपनीकडून केला जाईल. जिल्हाधिकारी शुक्ला यांनी सांगितले की, याबाबत तपास करणे आणि एका आठवड्यात अहवाल देण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एका चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here