घोसी : किसान सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये कारखान्याने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या उसापोटी सर्व पैसे अदा केले आहेत. थकीत आठ कोटी ५४ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविण्यात आले आहेत. कारखान्याने २० फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांकडून १२ लाख ७३ हजार क्विंटल उसाची खरेदी केली होती. त्याचे मूल्य ४३ कोटी ३३ लाख ६१ हजार रुपये शेतकऱ्यांना देय होते. यापैकी शिल्लक राहिलेली रक्कम आठ कोटी ४५ लाख रुपये देण्यात आले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, किसान कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनील दत्त यादव यांनी सांगितले की, थकीत ऊस बिलांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपापली बँक खाती तपासावीत. ज्यांचे क्रमांक कारखाना अथवा समितीच्या कम्प्युटरमध्ये नोंद नसेल, त्यांनी आपल्या खात्याचा नंबर अपडेट करावा. ज्या शेतकऱ्यांना ऊस बियाण्यांची गरज असेल त्यांनी कारखान्याशी, ऊस पर्यवेक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.