केरळ-महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्यांना आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य

केरळ आणि महाराष्ट्रातील वाढते कोरोना रुग्ण पाहता कर्नाटक सरकारने आता या दोन्ही राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. शनिवारी, ३१ जुलै रोजी कर्नाटकचे माजी आरोग्य मंत्री डॉ. सुधाकर यांनी ही घोषणा केली.

कर्नाटक सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, आता केरळ आणि महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी निगेटिव्ह आरटी-पीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक असेल. हा अहवाल ७२ तासांपेक्षा अधिक जुना असून नये. याशिवाय कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या आहेत. आरोग्य तथा कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव जावेद अख्तर यांनी पत्रात म्हटले आहे की, सध्याची कोविड १९ची स्थिती पाहता शेजारील केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांवर कडक निर्बंध लादण्याची गरज आहे. विमान, बससेवा अथवा ट्रेनसह खासगी वाहनांतून येणाऱ्या सर्वांना हे प्रमाणपत्र बंधनकारक राहील. केरळ आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या विमान प्रवासासाठीही हे दरजेचे आहे. विमान कंपन्यांनी अशा प्रवाशांना प्रवेश द्यावा, जे ७२ तासांतील आरटीपीसीआर चाचणी अहवाल दाखवतील. रेल्वेतील प्रवाशांकडेही असा अहवाल असणे बंधनकारक आहे.
दरम्यान, केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. शनिवारी केरळमध्ये ४१,६४९ नवे रुग्ण आढळले. यासोबतच सक्रीय रुग्णसंख्या ४,०८,९२० झाली आहे. तर महाराष्ट्रात शनिवारी ६,९५९ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे सक्रीय रुग्णसंख्या ७६,७५५ झाली आहे. कर्नाटकमध्येही रुग्णसंख्या घटल्याचे दिसत होते. मात्र ती पुन्हा वाढू लागल्याने कडक निर्बंध लागू केले गेले आहेत
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here