सुरुवातीच्या सत्रात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ५२ पैशांनी घसरुन रुपयाचा निच्चांक

विदेशी बाजारात अमेरिकन चलनाची मजबुती आणि विक्रीचा मारा कायम राहील्याने सोमवारी सुरुवातीच्या सत्रात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ५२ पैशांनी घसरुन रुपया आजवरच्या ७७.४२ या निच्चांकी स्तरावर पोहोचला. आंतरबँक परकीय चलन विनिमय बाजारात रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ७७.१७ वर खुला झाला. त्यानंतर पुन्हा घसरणीची नोंद होत ७७.४२ वर आला. गेल्यावेळी बंद झाल्याच्या तुलनेत ५१ पैशांची घसरण झाली आहे.

याबाबत इंडिया डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, रुपया शुक्रवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ५५ पैशांनी घसरून ७६.९० वर बंद झाला होता. चलनवाढीच्या चिंतेमुळे गुंतवणूकदार जोखीम पत्करू इच्छित नाहीत असे विदेशी मुद्रा व्यापार्‍यांनी सांगितले. यांदरम्यान प्रमुख चलनाचा दर अमेरिकन डॉलरच्या तुलनेत स्थिती दर्शविणारा डॉलर निर्देशांक ०.३५ टक्के वाढून १०४.०२ वर पोहोचला. जागतिक तेल मानक ब्रेंट क्रूड वायदा ०.१४ टक्के वाढून ११२.५५ डॉलर प्रती बॅरल या स्तरावर आला. शेअर बाजारातील अस्थायी आकडेवारीनुसार, परदेशी संस्थांत्मक गुतंवणुकदारांनी शुक्रवारी निव्वळ ५,५१७.०८ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here