रुपया पिछाडीवर, आशियात सर्वात खराब स्थिती

67

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या सावटाखाली संपत आलेले २०२१ हे वर्ष रुपयासाठी चांगले ठरलेले नाही. यावर्षी रुपया आतापर्यंत चार टक्के घसरला आहे. गेल्या काही दिवसात २० महिन्यांच्या निच्चांकी स्तरावर रुपया पोहोचला आहे. यादरम्यान, रुपयाची स्थिती आशियात सर्वात खराब चलनाच्या रुपात झाली आहे.

सततच्या घसरणीनंतर मंगळवारी झालेल्या व्यवहाराच्या सत्रात रुपया काही प्रमाणात मजबूत झाला. यापूर्वी रुपयात सातत्याने घसरण झाली. फक्त डिसेंबरच्या तिमाहीचा विचार केला तरी रुपया दोन टक्के खालावला आहे. यांदरम्यान ब्लूमबर्गच्या एका सर्व्हेमध्ये रुपया ७६.५० रुपये प्रती डॉलरपर्यंत घसरू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही अर्थतज्ज्ञांनी तर भारतीय चलनाची अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ७८ पर्यंत घसरण होईल अशी शक्यता व्यक्त केली आहे. भारतीय रुपयाच्या खराब स्थितीमुळे परदेशी गुंतवणुकदारांनी सातत्याने विक्रीचा सपाटा लावला आहे. भारतीय शेअर बाजारात एफआयआयनी सातत्याने पैसे काढून घेतले आहेत. त्यामुळे बीएसई सेन्सेक्स ऑक्टोबरच्या उच्चांकापासून दहा टक्के खाली घसरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here