रुसमध्ये अधिक साखर उत्पादनामुळे साखर अधिशेष ची समस्या

मॉस्को: रुसमध्ये गेल्या एक दशकात साखरेचे उत्पादन दुप्पट झाले आहे आणि या हंगामातही उत्पादनात 20 टक्के वाढ होण्याची आशा आहे. रुस मधील साखर निर्माता संघाच्या मतानुसार, साखरेच्या वाढत्या उत्पादनामुळे साखरेच्या अतिरिक्त साठ्याची समस्या गंभीर होत आहे. साठ्याची अन्य कुठलीही सोय नसल्याने, कारखान्यांना नाइलाजाने साखर चक्क मोकळ्या आकाशाखाली ठेवावी लागत आहे. यामुळे साखरेचा दर्जा घसरु शकतो.

यूनियन चे अध्यक्ष एंट्री बोडिन यांनी लंडन मध्ये एक इंटरनॅशनल शुगर ऑर्गनायझेशन च्या सेमिनारमध्ये सांगितले की, साखर साठ्यासाठी इतर कुठलाही मार्ग आपल्याकडे नाही. या साखरेवर पुन्हा प्रक्रिया करावी लागू शकते. कारण गुणवत्ताहिन साखर कुणी खेरदी करु शकेल असे सांगता येत नाही. रुसमधील साखर उद्योकाने अलीकडेच एक बदल होताना पाहिला आहे. रुस ला निर्यात बाजारात संघर्ष करावा लागतो, कारण हा देश इतर देशांप्रमाणे प्रसंस्करण मध्ये कुशल नाही.

बोडिन म्हणाले की, हंगामात रुसमधील साखरेचे उत्पादन एकूण 7.2 मिलियन टन होण्याचा अंदाज आहे आणि आसपास च्या देशांमध्ये केवण 1 दशलक्ष टनांपर्यंत निर्यात करता येवू शकते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here