दमास्कस : युक्रेनमुळे निर्माण झालेल्या संभाव्य संकाटाला तोंड देण्यासाठी सिरीयाच्या मंत्रिमंडळाने अनेक निर्णय जाहीर केले आहेत. याबाबत Xinhua या वृत्तसंस्थेच्या एका अहवालानुसार, पुढील दोन महिन्यांत मुलभूत साहित्य जसे गहू, साखर, खाद्यतेल, तांदूळ आणि बटाटा याची साठवणूक करण्याचे व्यवस्थापन आणि यामध्ये वाढ करण्याबाबतच्या उपायांचा यात समावेश आहे.
आर्थिक आणि बँकिंगच्या स्तरावर सरकारने पुढील दोन महिन्यांच्या तकालावधीत याची स्थिरता निश्चित करण्यासाठी त्यावरील नियंत्रण अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या उपायांमुळे कोणत्याही प्रकारच्या आर्थिक उतार-चढावापासून बचाव करणे शक्य होईल. तसेच स्थानिक बाजारावर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या होणाऱ्या दबावापासून बचाव करणे शक्य होणार आहे.