साखर विश्व प्रतिष्ठान तर्फे साखर कर्मचारी व शेतकरी सभासदांसाठी संयुक्त स्नेहमेळाव्याचे आयोजन  

375

साखर व्यवसायाकडे पाहिले तर खूप मोठे बलाढ्य विश्व, यामुळे ग्रामीण भागात विकासही मोठा झपाट्याने झाला आहे. हे नाकारुन चालणार नाही. या क्षेत्रामुळे राजकीय बलस्थानेही प्रबळ झाली आहेत हेही तितकेच खरे, परंतू ज्यावर या साखर कारखानदारीचा मूळ पाया आहे, तो म्हणजे यात काम करणारे साखर कामगार, कर्मचारी व शेतकरी सभासद. हे घटक मुलभूत सुविधांपासून कोसो दूर राहिलेले आहेत. जसे की राहणेसाठी हक्काचे घर, मुलांचे उच्च शैक्षणिक धोरण- सोई सवलती, प्रगती, रोजगार, व्यवसाय उपलब्धता, आरोग्य  हॉस्पिटल सुविधा,

मार्केटींग / बँकीग आर्थिक सुविधा आदींचा खूप मोठा अभाव आहे. नव्हे-नव्हे तर मुळी साठ ते सत्तर वर्षात अशी व्यवस्थाच उभी राहू शकलेली नाही किंवा तसा प्रयत्नही झाल्याचे ऐकीवात नाही. याकरीता गेली दोन  वर्षा पासुन ‘‘शुगर इंडस्ट्रीज ऋणानुबंध-एक परिवार’’ या सोशल मिडीयाच्या माध्यमातून या क्षेत्रातील असंख्य कार्यकारी संचालक खातेप्रमुख, इंजिनिअर, केमिस्ट व प्रत्येक विभागातील अधिकारी, कुशल कामगार यांना घेऊन राज्यस्तरीय ‘‘साखर विश्व प्रतिष्ठान’’ या  व्यासपिठाच्या माध्यमातून राजकारण विरहीत सामाजिक कार्याची मुहर्तमेढ ज्ञानराज्याची भूमि नेवासा-अहमदनगर येथून उभी राहिले आहे. तर याच जनजागृतीच्या दृष्टीकोनातून साखर उद्योगातील सर्व अधिकारी, कर्मचारी, उद्योजक, शेतकरी, हितचिंतक यांचा संयुक्त स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे

१.  श्री.शेखर गायकवाड, साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य
२.  श्री. प्रकाश नाईकनवरे,कार्यकारी संचालक नॅशनल फेडरेशन, दिल्ली
३.  श्री. संजय खताळ,कार्यकारी संचालक राज्य फेडरेशन, मुंबई
४.  श्री. अजित चौगुले, कार्यकारी संचालक वेस्ट इंडियन शुगर मिल्स असो.

हा संयुक्त सनहमेळावा २८/०७/२०१९ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ०४.०० पर्यंत DSTA हॉल, शिवाजीनगर पुणे येथे होणार आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here