सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याकडून निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी: अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे

कोपरगाव: प्राथमिक पातळीवर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव मध्ये पहिले 5 कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने उभारण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष श्री. बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शना खाली भागातील नागरिकांना कोरोना ची लागण होऊ नये या साठी डेटॉलचा वापर करून कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यावर संजीवनी उद्योग समूहाने भर दिला आहे.

या कक्षाचा उपयोग पोलीस, आरोग्य कर्मचारी तसेच महत्वाच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना होणार आहे. एकूण पाच निर्जंतुकीकरण कक्ष कोपरगाव शहरात बसवण्यात आले असून ते कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती कारखान्याच्या वतीने देण्यात आली.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here