सहकारमहर्षी थोरात कारखाना ठिबकसाठी देणार एकरी ५० टक्के अनुदान : ओहोळ

अहमदनगर : संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याकडून २०२४-२५ या गळित हंगामाकरिता ठिबक सिंचनसाठी प्रतिएकरी ५० टक्के अनुदान तर प्लास्टिक ट्रेमधील प्रतिरोपासाठी १ रुपये अनुदान दिले जाणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली. ओहोळ म्हणाले की, काँग्रेसचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने कायम उसाला उच्चांकी दर दिला आहे. को-जनरेशनसह विविध इतर उपक्रम राबवताना कारखान्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल या कारखान्याचा राज्य व राष्ट्रीय पातळीवर सन्मान करण्यात आला आहे.

ऊस विकास योजनेअंतर्गत या गळित हंगामासाठी जे शेतकरी ऊस लागवड करतील किंवा खोडवा पीक घेतील, तसेच ज्यांनी आडसाली ऊस लागवड केलेली असेल, अशा शेतकऱ्यांना प्रति एकरी पेप्सी लेटरल ठिबक सिंचनसाठी ५० टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचनावरील ऊस क्षेत्रात मिळणारे १०० रुपये अनुदानाचा लाभ मिळणार नाही. ऊस लागवड योजना व ऊस विकास कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी कारखान्याच्या शेतकी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन व्हा.चेअरमन संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व भाऊसाहेब खड़े यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here