सहारनपूर : जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे २७० कोटी थकीत

सहारनपूर : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपून अनेक महिने उलटले आहेत. मात्र, जिल्ह्यातील तीन कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांना ऊस बिले दिलेली नाहीत. या कारखान्यांकडे सुमारे २७० कोटी रुपये थकीतआहेत. गागनौली, गागलहेडी आणि शेरमऊ या कारखान्यांना थकबाकीदारांमध्ये समावेश आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना १०० टक्के बिले दिली आहेत. मात्र, या तीन कारखान्यांनी पैसे थकवल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ऊस नियंत्रण अधिनियमानुसार, साखर कारखान्यांनी ऊस खरेदी केल्यानंतर १४ दिवसात पैसे देण्याचा कायदा आहे. मात्र, या कारखान्यांनी पैसे थकवले आहेत. गांगनौली कारखान्याकडे २०१.६२ कोटी, गांगलहेडी कारखान्याकडे ५०.५ कोटी रुपये तर शेरुमऊ कारखान्याकडे १९.४५ कोटी रुपये थकीत आहेत. दुसरीकडे देवबंद, ननौता, सरसावा या कारखान्यांनी शेतकऱ्यांना १०० टक्के बिले दिली आहेत. कारखान्यांकडून बिले वसूल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here