गागलहेड़ी साखर कारखान्याने लाँच केले सेफ्टी सॅनिटायझर

सहारनपुर : शासनाच्या निर्देशानुसार कोविड-19 महामारी वर अंकुश लावण्यासाठी दया शुगर मिल गागलहेड़ी कडून सेफ्टी नावाने सॅनिटायझर तयार केले गेले आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी अखिलेश सिंह यांनी हे लॉन्च केले. त्यांनी सांगितले की, सेफ्टी सॅनिटायझर बाजारात कमी किमतीत उपलब्ध आहे.

दया शुगर मिल गागलहेड़ी या साखर कारखान्याचे अधिकारी रविद्र ग्रेवाल यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या प्रेरणेमुळे साखर कारखान्याकडून दोन हजार लीटर सॅनिटायझर उत्पादन क्षमतेनुसार केले जात आहे, ज्यामध्ये 50 एमएल, 100 एमएल, 200 एमएल, 500 एमएल तसेच पाच लीटर पर्यंत पॅकींग सेफ्टी हॅन्ड सॅनिटायझर ची केली जात आहे.

कारखाना व्यवस्थापनाकडून हे उत्पादन लवकरच पाच हजार लीटर प्रतिदिन करण्याचे ध्येय आहे. आतापर्यंत कारखान्यांनी उत्पादीत केलेले हॅन्ड सॅनिटायझर छोट्या पॅकेट मधून कमी दरात बाजारात उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी सामान्य लोकांना हे हॅन्ड सॅनिटायझर कमी दरात मिळत आहे.

यावेळी अपर जिल्हाधिकारी वित्त व महसूल विनोद कुमार, जिल्हा संख्या अधिकारी अमित कुमार, साखर कारखाना यूनिट हेड आदित्य कांबोज, रविद्र ग्रेवाल, जिल्हा ऊस अधिकारी कृष्ण मोहनमणि त्रिपाठी आदि उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here