25 जुलैपर्यंत ऊसाचे पैसे दिले नाहीत तर शेतकर्‍यांनी दिला धरणे आंदोलनाचा इशारा

मेरठ: उत्तर प्रदेशच्या सहारनपूर मध्ये शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरामध्ये भारतीय किसान संघटनेच्या बैठकीत निश्‍चित करण्यात आले की, जर साखर कारखाना 25 जुलै पर्यंत संपूर्ण ऊसाचे पैसे देत नसेल तर जिल्हा ऊस अधिकारी सहारनपूर यांच्या विरोधात धरणे आंदोंलनासह घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भातील निवेदन कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक डॉ. प्रशांत कुमार यांना देण्यात आले आहे.

मंगळवारी शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात आयोजित बैठक़ीत भारतीय किसान संघटनेचे जिल्हाध्यक्ष ठाकुर अजब सिंह यांनी सांगितले की, साखर कारखान्याकडून अनावश्यक रुपात क्षेत्रातील शेतकर्‍यांकडून हिस्सा प्रमाण पत्राची मागणी होत आहे, यामुळे शेतकर्‍यांना अडचणीतून जावे लागत आहे.
ते म्हणाले की, आगामी गाळप हंगामापूर्वी साखर कारखान्यातील मशीन्स दुरुस्त करावेत जेणेकरुन गेल्या हंगामाप्रमाणे कारखान्यातील बॉयलर फुटु नये आणि शेतकर्‍यांसमोर ऊस पुरवठ्याची समस्या उद्भवू नये. यार्ड ची समस्या नीट केली जाईल तसेच शेतकर्‍यांसाठी पिण्याचे पाणी तसेच प्रकाशाची योग्य व्यवस्था केली जाईल आणि तसेच साफ सफाईचीही योग्य व्यवस्था केली जाईल.

ते म्हणाले की, शेतकर्‍यांसाठी शेतकरी भवनची दुरुस्ती करुन शेतकर्‍यांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था केली जावी आणि पिण्याच्या पाण्यासाठी शुद्ध पाण्याच्या टाकीची व्यवस्था केली जावी. ते म्हणाले, 25 जुलै पर्यंत ऊस थकबाकी न भागवल्यास संघटनेला जिल्हा ऊस अधिकारी सहारनपूर येथे धरणे ओंदोलन करावे लागेल.

यावेळी ठाकुर श्यामवीर सिंह, सुभाष सिंह, ब्रह्मदत्त त्यागी, कुलदीप, राज कुमार, जवाहर सिंह, सतपाल सिंह, तरसेम सिंह, कुंवर सिंह, विवेक चौधऱी, सुनील त्यागी, आनंद प्रकाश बलराज सिंह, पवन कुमार, मेनपाल सिंह आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here