कोईंबतूर येथील शक्ती शुगर्स लिमिटेडने (Sakthi Sugars) आज एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. कंपनीने सोमवारी जाहीर केले की, आपल्या ओडिसामधील शुगर आणि डिस्टिलरी युनिट्स तसेच तामीळनाडूतील सोया कारखान्याची विक्री केली जाणार आहे. हे युनिट्स विक्री करण्याच्या निर्णयामागे कंपनीला आपल्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्याचा उद्देश आहे. त्यासाठी हे निर्णय घेतले गेले आहेत.
कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या दोन्ही युनिट्सच्या विक्रीस मंजुरी देण्यात आली आहे.
शक्ती शुगर्सने अनेक दशकांपूर्वी या युनिट्सचे अधिग्रहण केले होते. कंपनी साखर, सोया याशिवाय इतर अनेक उत्पादनांची निर्मिती करते.