आता मॉलमध्येही मिळणार पेट्रोल…?

नवी दिल्ली : केंद्र सरकार मोठे शॉपिंग मॉल्स आणि रिटेल दुकानांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची विक्री करण्याच्या प्रस्तावाला आज मंजूरी देण्याची शक्यता आहे. याबरोबरच खासगी पेट्रोलपंपाबाबतही मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

आज होत असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी सरकार आज काही महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे. त्यामध्ये पेट्रोल, डिझेल शॉपिंग मॉल आणि रिटेल दुकानांमध्ये मिळण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. या बरोबरच खासगी पेट्रोलपंपाबाबतही मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सरकार 2000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीऐवजी आता 200 कोटीचे एकूण मूल्य असणाऱया कंपन्यांना पेट्रोलपंप सुरू करण्याची परवानगी देऊ शकते. या बरोबरच पेट्रोलपंप सरू करण्यासंबंधी इतर नियमांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. शिवाय एखादी कंपनी पेट्रोलियम सेक्टरमध्ये व्यवसाय करत नसली, तरी देखील अशा कंपनीला इंधन रिटेल परवाना मिळू शकणार आहे. त्याबाबतचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे.

या व्यतिरिक्त, केंद्र सरकार शेतकर्‍यांना दिवाळीची भेट देण्याचीही शक्यता आहे. रब्बी पिकांची पेरणी सुरू होण्यापूर्वी सरकार मुख्य पिकांच्या किमान आधारभूत मूल्यात वाढ करू शकते. याबाबत दीर्घ काळापासून शेतकर्‍यांकडून मागणी होत आहे. आता ही मागणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here