देशभरात ई-लिलावाद्वारे गव्हाच्या विक्रीची दुसरी फेरी बुधवार, दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे.
भारतीय अन्न महामंडळाने (FCI) दिनांक 1 आणि 2 फेब्रुवारी रोजी झालेल्या पहिल्या ई-लिलावाच्यावेळी उपस्थित सर्व विजेत्या बोलीदारांना खर्च कमी करण्याचे निर्देश दिले आहेत तसेच किंमती समाविष्ट करण्यासाठी देशभरातील संबंधित डेपोमधून ताबडतोब साठा उचलावा आणि संबंधित बाजारपेठांमध्ये तो उपलब्ध करून द्यावा, असेही निर्देश जारी केले आहेत.ई-लिलावात विकला जाणारा गहू उचलल्यानंतर आणि पीठ बाजारात उपलब्ध झाल्यानंतर भाव आणखी घसरतील.
देशातील गहू आणि पीठाच्या वाढत्या किमतीला तोंड देण्यासाठी, मंत्रीमंडळाने केलेल्या शिफारशीनुसार, भारतीय अन्न महामंडळाने दिनांक 1 आणि 2 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या ई-लिलावासाठी केंद्रीय पूल स्टॉकमधून गव्हाच्या राखून ठेवलेल्या 25 एलएमटी गव्हाच्या साठ्यापैकी 22.0 एलएमटी गहू खुल्या बाजारात (घरगुती) विविध मार्गांद्वारे विक्री करण्याच्या योजनेला परवानगी दिली.
या ई-लिलावात पहिल्या आठवड्यात 1150 हून अधिक बोलीदार सहभागी होण्यासाठी पुढे आले आणि देशभरात 9.2 LMT ची विक्री झाली.
(Source: PIB)