कृषी ड्रोनच्या विक्रीत होतेय वाढ

नवी दिल्ली: भारतीय कृषी ड्रोन निर्माता IoTechWorld एव्हिगेशनने गेल्या आर्थिक वर्षात जवळापास ५०० ड्रोनची विक्री केली आहे. आणि चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये याचे लक्ष्य जवळपास ३,००० ड्रोन विक्री करण्याचे आहे. २०१७ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी विस्ताराची योजना तयार करीत आहे. कंपनीने आपल्या भारतातील नेटवर्कचा फायदा मिळवणे आणि रशिया, आफ्रिका, ब्राझील तसेच सार्क क्षेत्रातील नव्या बाजारपेठेत प्रवेश करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. कंपनीने या देशातील संभाव्य खरेदीदारांशी आधीच चर्चा सुरू केली आहे.

आयओटेकवर्ल्ड एव्हिगेशनचे सह-संस्थापक दीपक भारद्वाज म्हणाले की, आम्ही यावर्षी ३,००० ड्रोन विक्री करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले आहे. नवे तंत्रज्ञान, स्पर्धात्मक मूल्य निर्धारण आणि प्रभावी वितरण रणनीतीसोबत आम्ही हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या आमच्या क्षमतेबाबत आश्वस्त आहोत. कंपनीने गेल्या आठवड्यात आपल्या लोकप्रिय कृषी ड्रोन “AGRIBOT”साठी एक नव्या “A6” मॉडेलचे अनावरण केले आहे, जे आपल्या आधीच्या मॉडेलच्या तुलनेत अधिक कॉम्पॅक्ट आणि पोर्टेबल मॉडेल आहे.

कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर शेतकऱ्यांसाठी अधिक किफायतशीर मानला जातो. कारण ते खूप अधिक पिक उत्पादन मिळवत अॅग्रोकेमिकल्स, खते आणि पाण्याची फवारणी यामध्ये खूप प्रमाणात बचत करतात. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीने कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापरावर आपले लक्ष केंद्रीत करीत आहे. कृषी ड्रोन खरेदीसाठी सरकारकडून आर्थिक मदतीचीही तरतूद करण्यात आली आहे.

IoTechWorld चे अन्य एक संस्थापक आणि संचालक अनुप उपाध्याय म्हणाले की, IoTechWorld कडे परदेशी बाजारपेठेत आपल्या ड्रोन व्यवसायाचा विस्तार करण्याची क्षमता आहे. कारण विविध देशांमध्ये अनेक संभाव्य खरेदीदार विक्रीनंतरची सेवा आणि चीनविरोधी भावनेबाबत चिंतेमुळे चीनकडून ड्रोन आयात करण्यास धजावत नाहीत. आत्मनिर्भर भारत हा दृष्टिकोन साकार करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकताना केंद्र सरकारने २०२१ मध्ये ड्रोन आणि ड्रोनच्या घटकांसाठी उत्पानाबाबत प्रोत्साहन (पीएलआय) योजना मंजूर केली होती.

सरकारने भारतीय उत्पादकांना जागतिक स्तरावर स्पर्धा करणे, गुंतवणूक आकर्षित करणे, निर्यात वाढविणे, भारताला जागतिक पुरवठ्याच्या साखळीशी जोडणे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ड्रोनसह विविध क्षेत्रामध्ये उत्पादनाशी जोडलेल्या प्रोत्साहन (पीएलआय) योजना सुरू केल्या आहेत. IoTech ने म्हटले आहे की, या क्षेत्रासाठी प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजना एक गेमचेंजर बनू शकते आणि भारत लवकरच जागतिक स्तरावर ड्रोन निर्मितीमध्ये एक प्रमुख व्यावसायिक बनू शकतो. या ड्रोनमध्ये कमीत कमी ७० टक्के मेड इन इंडिया कंपोनंट्स आहेत आणि स्थानिक स्तरावर अधिस विक्री केल्यामुळे त्याच्या किमती कमी येण्याची अपेक्षा आहे.

पारंपरिक पद्धतीने शेतकरी आपल्या पिकावर भौतिक रुपात फवारणी करतो. हे काम त्यामुळे महागडे आणि वेळखाऊ असल्याचे दिसून येते. मनुष्यबळाचा वापर करुन फवारणीच्या पद्धतीमध्ये एक एकरासाठी शेतकऱ्याला २०० लिटर पाणी आणि जादा प्रमाणात रासायनिक औषधांसह कामगारांसाठी जवळपास १००० रुपये खर्च करावे लागतात. तर ड्रोन शेतकऱ्यांचे पैसे आणि वेळ वाचविण्यास उपयुक्त ठरतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here