कुशीनगरमध्ये थकीत ऊस बिलप्रश्नी समाजवादी पार्टीचे आंदोलन

कुशीनगर : शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलासह विविध आठ मागण्यांसाठी समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कप्तानगंज साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावर चार तास धरणे आंदोलन केले. राज्यपालांच्या नावे असलेले निवेदन उपजिल्हाधिकारी देशदीपक सिंह यांना देण्यात आले.

सकाळी माजी राज्यमंत्री राधेश्याम सिंह, आमदार रामअवध यादव, माजी आमदार पूर्णमासी देहाती यांच्यासह कार्यकर्ते कप्तानगंज साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आले. त्यांनी घोषणाबाजी करत धरणे आंदोलन सुरू आहे. साखर कारखान्याकडे १०० कोटी रुपये थकीत आहेत. ते तातडीने मिळाले पाहिजेत, डीझेल, पेट्रोल, गॅसची दरवाढ कमी करा, उत्तर प्रदेश राज्य साखर संघाच्या लक्ष्मीगंज, रामकोला खेतान आणि छिनौली साखर कारखाने बंद आहेत. त्यांचे पिपराईचप्रमाणे नूतनीकरण करावे, कप्तानगंज रेल्वे क्रॉसिंगवर ओव्हरब्रीज बनवावा, छपरा – गोमतीनगर स्पेशल ट्रेनला रामकोला रेल्वे स्टेशनवर थांबवावे, कुशीनगर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

माजी रार्जयमंत्री राधेश्याम सिंह म्हणाले, भाजपचे सरकार शेतकऱ्यांची लूट करत आहे. त्याविरोधात आंदोलन तीव्र केले जाईल. सपाचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र प्रताप सिंह, परवेज आलम, रामचंद्र निषाद आदींची भाषणे झाली. सुग्रीव प्रसाद संत यांनी सूत्रसंचालन केले. घनश्याम यादव, शैलेश यादव, रमेश यादव, विजय कुशवाहा, डॉ. के. के. यादव, फिरोज अहमद, काशी नरेश सिंग, दीपक सिंह, सतीश यादव, रवींद्र सिंह, सुभाष गुप्ता, खलील अन्सारी, अल्लाउद्दीन अन्सारी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here