टोळ दलांपासून पीक वाचवण्यासाठी शेतकरी करत आहेत देखरेख

129

समस्तीपूर : पाकिस्तानातून आलेल्या टोळ दलाने राज्यातील पश्‍चिम चंपारण मध्ये डेरा घातल्याने तेथील पीकांचें मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे तेथील शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण आहे.यानंतर आता टोळ दल पुढे जाणार. यामुळे आतापासूनच हसनपूर विभागा मध्ये तयारी सुरु करण्यात आली आहे. पीकांची देखरेख केंली जात आहे. ज्या शेतामध्ये टोळ दल उतरते, तेथील सार्‍या पीकाचे ते नुकसान करते. प्रशासनिक स्तरावरुन शेतकर्‍यांमध्ये जागरुकता निर्माण केली जात आहे. हसनपूर विभागातील बहुसंख्य शेतकरी ऊस शेतीवर अवलंबून आहेत. विभागातील जवळपास छत्तीसशे एकर जमिनीत ऊसाचे पीक आहे. यामुळे येथील शेतकरी आतापासूनच पीकाची देखरेख़ करत आहेत. शेतकर्‍यांना आपापल्या शेतात ढोल नगाड्यांसह उभे राहावे लागत आहे. याबाबत ऊस शेतकरी लालबहादुर यादव, विजय कुमार मिश्र,अमन कुमार सिंह, त्रिभुवन राय, शिवचंद्र यादव, पूर्व प्रखंड प्रमुख सुभाषचंद्र यादव, राजीव कुमार सिंह आदी म्हणाले की, टोळ दलाने बिहारमध्ये प्रवेश केल्या पासूनच हसनपूर साखर कारखाना परिक्षेत्रातील शेतकरी पीकांच्या सुरक्षेसाठी स्वत: त्यांची देखरेख करत आहेत. सरकारकडून कीटकनाशक औैषध आणि ट्रॅक्टर द्वारा स्वचालित स्प्रे मशिन मधून फवारणी करण्याची व्यवस्था केली जावी. दुसरीकडे गट कृषी पदाधिकारी पुरुषोत्तम कुमार दावा करत आहेत की, टोळ दलांना थांबवण्यासाठी कृषी विभाग योग्य पावले उचलण्यास तयार आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here