साखर कारखान्यातर्फे हमजापूरमध्ये सॅनिटायझेशन मोहीम

196

शाहजहांपूर : डालमिया शुगर मिलच्यावतीने निगोही आणि हमजापूर या गावांमध्ये सॅनिटायझेशन मोहीम राबविण्यात आली. कोरोनाच्या संकट काळात निगोहीच्या डामलिया साखर कारखान्याने पुढाकार घेतला आहे.

मंगळवारी सकाळी सात वाजता कर्मचाऱ्यांनी हमजापूर चौकात आमदारांच्या घरापासून सॅनिटायझेशन मोहिमेला सुरुवात केली. विभाग प्रमुख मनोज वर्मा यांनी स्वतः पाईप घेऊन हमजापूर चौक परिसरात सॅनिटायझेशन करून कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या कामात सहभाग नोंदवला. उप कार्यकारी संचालक कुलदीप कुमार यांनी सांगितले की निगोही आणि हमजापूर येथे सॅनिटायझेशन झाल्यानंतर कारखाना आता इतर लांबच्या गावांतही ही मोहीम सुरू ठेवणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here